पोस्टात सोशल डीस्टशिंग मध्ये कामकाज
बार्शी : पोस्ट ऑफिस ची सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याकारणाने लॉक डाऊन च्या काळात देखील पोस्ट ऑफिस सेवा देत आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर सुरेश शिरसी यांचे मार्गदर्शनाखाली, भारतीय टपाल खात्याने सोशल डीस्टशिंग कायम राहील याची काळजी बार्शी येथील सर्व पोस्ट ऑफिस घेत आहेत तसेच बार्शी तसेच कर्मवीरनगर या महत्वाच्या पोस्ट ऑफिस मध्ये किमान कर्मचारी कामावर बोलवून कामकाज चालवले जाते. बार्शीचे पोस्टमास्टर श्रीमती मंगल कांबळे, स.पोस्टमास्तर उल्हास सुतार, कर्मवीरनगर चे पोस्टमास्टर श्री महेश तोष्णीवाल यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालू असलेची माहिती उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली.
तसेच या पोस्ट ऑफिस च्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्यासाठी पाणी साबण हातावर स्यांनीटायझर वापर करूनच पुढे कार्यालयात सोडले जाते. बार्शी पोस्ट ऑफिस च्या प्रवेशद्वाराजवळ एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येउन योग्य त्या सूचना दिल्या जातात.अशी माहिती श्री देशमुख यांनी दिली.
0 Comments