बलवडी ता सांगोला येथे संपूर्ण गाव बंद ठेवून जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद दिला
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गाव सुरक्षित राहावे म्हणून गेल्या दोन दिवस अगोदर बलवडी ग्रामपंचायतिच्या वतीने जनतेला घरी राहण्याचे आव्हान केले होते,गाव आपले चांगले रहावे या चांगल्या विचाराने संपूर्ण गाव सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यन्त बंद करून घराच्या बाहेर कोणीही फिरकले नाही
बलवडी गावची 5000 लोकसंख्या असून या गावात आज दिवसभर एकही व्यक्ती बाहेर आला नाही .गावातील सर्व लोकांनी अगोदरच सर्व लागणाऱ्या गरजेच्या वस्तू अगोदरच घरात आणून ठेवल्या होत्या त्यामुळे गरजेच्या वस्तूसाठी कोणीही बाहेर पडले नाही .सर्व सुजाण नागरिकांचे कौतुक होत असून पोलीस यंत्रणा सुद्धा नागरिकांना आव्हान करून आपली जबाबदारी प्रामाणिक पणे निभावत आहे त्याचबरोबर देशातील सर्व कामसू कर्मचाऱ्यासाठी गावातील नागरिकानी टाळ्या वाजवून त्याचे आभार व्यक्त केले आहे

0 Comments