प्लास्टीक बंदी बाबत अकलूज ग्रामपंचायतीमध्ये बैठक
अकलूज : अकलूज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे व त्या पासुन होणारे दुष्परिणाम यावर कायमचा तोडगा काढण्याकरीता सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने-पाटील, राहुल जगताप, आदित्य आर्वे, सुभद्रा वाईकर, कविता काशिद उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी बाबतची अधिसुचना दि.23 मार्च 2008 रोजी प्रसिध्द झालेली आहे. त्यामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये प्लास्टिक वापरावर पूर्णपणे निर्बंध घालणेत आलेले आहेत. मोठ-मोठ्या शहरात देखील प्लास्टिक वापरावर पुर्णपणे बंदी असुन तसे आढळल्यास दंडाची रक्कम आकारली जात आहे.यावेळी बोलताना सरपंच शिवतेजसिंह म्हणाले, प्लास्टिक हे नष्ट होत नसुन त्याच्या वापरामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. प्लास्टिक पिशवी व वस्तु सार्वजनिक गटारी, रस्त्यावर, कचरा कुंडी येथे पडल्यास तसेच मुक्या जनावरांनी त्याचे सेवन केले नंतर त्यांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच सार्वजनिक गटारी तुंबुन रहात असुन नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने सदर बाब अतिशय घातक आहे. या करीता नागरीकांना आवाहन करणेत येत आहे की, दैनंदिन वापरामध्ये प्लास्टिक वापर करणे टाळावे. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम या बाबत आपण वर्तमान पत्रे, प्रसार माध्यम या द्वारे वाचत व ऐकत असतो. या करीता सर्वांना आवाहन करणेत येत आहे की, प्लास्टिक न वापरणे बाबत आपण आपल्या पासुनच सुरूवात करू या व शेजारील आसपासचे नागरीकांना पण त्या बाबत आवाहन करू. प्लास्टिक मुक्त अकलूज करणेसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
0 Comments