Hot Posts

6/recent/ticker-posts

जनसेवा महिला संघटनेच्या वतीने भाजी मंडई मधील महीलांचा सन्मान

 जनसेवा महिला संघटनेच्या वतीने भाजी मंडई मधील महीलांचा सन्मान      




अकलूज(प्रतिनिधी) जनसेवा महिला संघटनेच्या वतीने भाजी मंडई अकलूज येथील पाले भाज्या विक्री करणाऱ्या १६० महिलांचा सन्मान खन नारळाने ओटी भरून व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
        जागतिक महिला दिनानिमित्त पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील व सौ. उर्वशीराजे धवलसिंह  मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतीताई कुंभार, शाहीन बागवान, जयश्री राजगुरू, अशा जगताप, रुपाली गांधी, यांनी  सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन भाजी मंडई येथे केले होते. जागतीक महीला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी व कर्तृत्वान  महीलांचा सन्मान केला जातो. परंतु अत्यंत दुर्लक्षीत असणाऱ्या भाजी मंडईतील महीलांचा रोजचा दिवस संघर्षमय असतो.महागाईच्या काळात संसारात हातबार लावत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत संघर्ष करीत असतात. उन्हाळा असो, पावसाळा असो, किंवा हिवाळा असो पहाटे भाजी मार्केट मध्ये जाऊन मोठ्या हिमतीने स्वःता माल भरून मंडईत घेऊन येणे तिथे दुकान लावणे माल मांडणे, ग्राहकांना सामोरे जाणे हा नित्यक्रम बनला आहे.तर पहाटे ५ तेे रात्री८ वाजेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते. भाजीपाला विकणारी प्रत्येक महीलां ख-या अर्थाने रणरागीणीच आहे. आणि या  रणरागीणीचा जनसेवा महिला संघटनेनेे ओटी भरून केलेला सन्मान सोहळा हा आदर्शवत ठरला. 
Reactions

Post a Comment

0 Comments