सासू आई तर सून लेक व्हावी - अँड प्रा.एस जी दंतकाळे
[सोलापूर ]- कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची मालिका ही अनादी काळापासून सुरू आहे याला रोखणे काळाची गरज आहे. कुटुंबात सासू आई व्हावी आणि सून मुलगी व्हावी अशा भूमिका जर प्रत्येक महिलांनी निभावू लागल्या की कुटुंबाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.असे मत दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रा.अँड एस.जी.दंतकाळे यांनी व्यक्त केले.
रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता दत्त नगर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिल्हा समिती च्या वतीने संघटनेच्या राज्यध्यक्षा माजी नगरसेविका कॉ नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्षा माजी नगरसेविका शेवंताताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ते बोलताना पुढे म्हणाल्या की, आज महिलांच्या संरक्षणासाठी सरकार चे अनेक कायदे आहेत. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा असे अनेक कायदे आहेत याचा वापर केला पाहिजे. सामाजिक, राजकीय,कला क्रीडा,साहित्य,उद्योग क्षेत्रात गगन भरारी घेतले पण संरक्षणा च्या दृष्टीने मात्र चिंता व्यक्त करण्यासारखी स्थिती आहे याला भेदण्यासाठी रूढी परंपरेची कोंडी फोडली पाहिजे.यानंतर नसीमा शेख यांनी संघटनेची राष्ट्रीय भूमिका मांडताना म्हणाल्या की,
आज देशात संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न प्रतिगामी लोक करत आहेत तेव्हा संविधानाच्या रक्षणासाठी देशवासियांची जबाबदारी आहे तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या शिक्षेची अमलबजावणी होण्याआधीच दुसरी घटना घडते ही न्याय व्यवस्थेची दिरंगाई कारणीभूत आहे.याचा निषेध व्यक्त केले व तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आपण महिलांनी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले.
यानंतर नगरसेविका कॉ कामीनीताई आडम यांनी महिलांची यशोगाथा ही प्रेरणादायी आहे ते सदैव जतन करावे असा आशावाद व्यक्त केले.प्रास्तविक संघटनेच्या सचिवा शकुंतला पानिभाते यांनी केले. सूत्रसंचालन गीता वासम तर आभार प्रदर्शन लिंगव्वा सोलापुरे यांनी केले.व्यासपीठावर संघटनेच्या सुनंदा बल्ला, पुष्पा पाटील, देवकर मावशी,निर्मला गंडी, अंबुबाई पाथरूठ आदी उपस्थित होते.यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहनाज शेख, शरिफा शेख,गुरुबाई मठपती, सोनाबाई नरोटे, जलालबी शेख, हसीना शहबाई, सावित्रीबाई गुंडला, आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments