Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरनगर येथे जागतिक महिलादिन साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरनगर येथे जागतिक महिलादिन साजरा


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरनगर व अंगणवाडी शंकरनगर येथे जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले  प्रथम गावचे सरपंच सौ रंजनाताई राजकुमार राठोड यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फूले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले नंतर श्री नंदकुमार  विजापुरे  यांनी महिला दिनाविषयी मनोगत व्यक्त केले नंतर संगीतखुर्ची स्पर्धा घेण्यात आले यात सौ पूजा विजयकुमार धारेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावले व सौ आशा संतोष जाधव यानी द्वितीय क्रमांक पटकावले विजेत्याना भेटवस्तु  देऊन सौ कविता भारत राठोड व श्रीम संगीता भिंगरु राठोड यांच्याहस्ते देण्यात आले व त्रिषा सतीश जाधव या 6 महिने पूर्ण मुलीचे  अर्ध वार्षिक वाढ दिवस महिला दिनदिवशी साजरा करण्यात आला.
          ६ महिने पूर्ण झाल्यावर वरचा पूरक अर्ध घट्ट आहार चालू करावा म्हणून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.व सरपंच यांच्या उपस्थितीत पोषण पंधरवडा ८मार्च ते २२मार्च  उदघाटन करूनउपस्थित सर्व महिला भगिनिंचे आभार सौ. दिपिका शशिकांत चव्हाण यांनी मानले  यावेळी सुमित्रा सुभाष राठोड  कमल जयसिंग चव्हाण  प्रेमा दत्तात्रय लाडे कीरण सतिश जाधव संगिता सोमलिंग पवार कमल भि चव्हाण आदी माता भगीनी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments