महिलांनी आहाराबाबत सतर्क रहाणे काळाची गरज - डॉ.औसेकर
सोलापूर (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व एस बी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एस बी प्राथमिक शाळेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध जाती धर्मातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला
सामाजिक कार्यासाठी प्रिया पाटील यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार शैक्षणिक कार्यासाठी रीत बीनिकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार एमएसईबी येथील कर्मचारी भाग्यश्री यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील नूतन लोखंडे यांना माता रमाई पुरस्कार आणि भाजीविक्रेते नूरजहा नदाफ यांना पहिली महिला शिक्षिका फातिमाबाई शेख हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र पुस्तक व गुलाब पुष्प असेच सन्मानाचे स्वरूप होते़
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. औसेकर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शाळेचे मुख्याध्यापक सतीश मोहिते शिवसंघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल चव्हाण जैन संघटनेचे शाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़
महिला दिनानिमित्त महिलांसाठी सकस आहार पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सुमारे ऐंशी महिलांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये प्रथम क्रमांक अनुराधा जाधव द्वितीय सुहासिनी भालेराव तृतीय क्रमांक शोभा कांबळे आणि उत्तेजनार्थ स्वाती सोनवणे हे विजेते ठरलेले होते
यावे यांनी महिलांनी आहार व आरोग्य विषयी सतर्क राहणे हे काळाची गरज असून महिला सकाळी सात वाजता आपले घरेदारे सोडून कामाला जातात कामाबरोबर आरोग्य व आहार याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या संरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड सर्दैव कटिबद्ध असून महिलांनी कोणत्याही अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेडशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख आशुतोष माने उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे सचिव सनी पटू संघटक गोविंद चव्हाण संपर्क प्रमुख अनिकेत कवाडे अविनाश चूलबुले विजय बिल्लेगुरू ईत्यादी सह महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते
0 Comments