प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे यांना दैनिक तुफान क्रांती च्या वतीने पुरस्कार प्रदान
सांगोला( जगन्नाथ साठे) ;- आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांना दैनिक तुफान क्रांती च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात शैक्षणिक, सामाजिक व संशोधक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल "साहित्य क्षेत्रातील सेवा पुरस्कार "उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा कविराज मंगल कार्यालय येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला.प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे यांना नुकताच आटपाडी तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, आणि विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने राजश्री शाहू सामाजिक कार्य गुणगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या हातकणंगले (कोल्हापूर) येथे झालेल्या परिवर्तन वादी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.डॉ रामदास नाईकनवरे यांना आतापर्यंत आदर्श शिक्षक, आदर्श संशोधक,आदर्श कलावंत,आदर्श कार्यकर्ता व कलावंत,साहित्य लेखन आदि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील असे एकूण ३७ पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक चळवळीतील ते एक अग्रेसर कार्यकर्ते असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक व संशोधक म्हणून ही त्यांची ख्याती आहे.
0 Comments