लऊळ येथे अज्ञात कारणावरून तरुणाचा खून,संशयित पितापुत्र अटकेत
लऊळ: लऊळ ता.माढा येथे शुक्रवार दि.६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. राजाराम शिवाजी घुगे( वय ३०)असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो लऊळ गावचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष खंडू गोरे(वय ३८) व खंडू सुखदेव गोरे (वय ७०) रा.लऊळ या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की राजाराम घुगे या तरुणाचा लऊळ एसटी स्टँड जवळील संतोष गोरे यांच्या घरासमोरील शेतात डोक्यात लाकडी दांडक्याच्या साहाय्याने मारून खून करण्यात आला.शनिवारी दि.७ रोजी कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात मयत राजाराम घुगे याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सांशीयतांची कसून चौकशी सुरू आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत.
0 Comments