कार्यकर्त्यांनी भाजपाचे विचार घराघरात पोहचवावेत--चेतनसिंह केदार--सावंत
सांगोला ( प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात भाजपचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील भाजप पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला संधी दिली जाईल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात भाजपचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी सर्व निवडणुका मोठया ताकदीने लढविणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. भाजपचे पॅनल तयार करून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे. भाजप म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाईल. भविष्यात सांगोल्याच्या राजकारणात भाजपची भूमिका महत्त्वाची असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.
भाजपच्या पदाधिकारी व विविध सेलच्या निवडीसंदर्भात महत्वाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, श्रीकांतदादा देशमुख, आनंदा माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, डॉ जयंत केदार, साहेबराव पाटील, एन वाय भोसले, विठ्ठल केदार, विजय बाबर, अभिजित नलवडे, दत्ता टापरे, गजानन भाकरे, संजय पाटणे, संभाजी आलदर, आनंद फाटे, अभिमन्यू पवार, रावसाहेब साळुंखे, नागेश जोशी, संजय गंभीरे, श्रीकांत पाटील, शीतल लादे, विलास होनमाने, उत्तम चौगुले, विस्तारक हणमंत कर्चे, परमेश्वर साळुंखे, राजाभाऊ इंगोले, यशवंत बाबर, सत्यवान सलगर, दिलीप सावंत, फैज्जूद्दीन शेख, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी मी रात्रंदिवस काम केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत थोड्याफार फरकाने आमचे उमेदवार पराभूत झाले. टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा यासाठी भाजपने मोठया प्रमाणात निधी दिला आहे. भाजपमध्ये हार्ड वर्क आहे. पदाधिकारी निवडीत कार्यकर्त्यांनी संधी न मिळाल्यास नाराज न होता काम करावे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपमध्ये काम करण्यासाठी संधी असून कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते संभाजी आलदर म्हणाले, काम करण्याची इच्छा असलेल्या सक्रिय कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवडीत संधी द्यावी प्रत्येक गावात शाखा काढून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संघटन निर्माण करावे. 15 ते 20 ग्रामपंचायती स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. सक्रिय कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी परमेश्वर साळुंखे म्हणाले, पॅनल तयार करून ग्रामपंचायत निवडणूक लढवावी. कांबळे म्हणाले, काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. यावेळी नागेश जोशी म्हणाले, भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी बैठक आयोजित केली आहे. क्रियाशील सभासदांना विविध पदांवर काम करण्याची संधी द्यावी. भाजपची मजबूत बांधणी करून प्रत्येक गावात शाखा स्थापन कराव्यात. सर्वच आघाडी, सेलच्या पदाधिकारी निवडी कराव्यात. भाजपमध्ये सर्वच जातीधर्मातील कार्यकर्त्यांला न्याय दिला जातो. तालुक्यात भाजप मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून आगामी सर्वच निवडणुका लढवाव्यात असे त्यांनी सांगितले.
दत्ता टापरे म्हणाले, भाजपमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक सदस्यत्व घ्यावे. प्रामाणिकपणे काम केल्यास भाजप निश्चितच मोठा पक्ष म्हणून तालुक्यात तयार झाला आहे. सर्वांना संघटित करून निवडणुकांना सामोरे जावे. येणाऱ्या काळात निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांला संधी द्यावी असे त्यांनी सांगितले.
गजानन भाकरे म्हणाले, भाजपमध्ये पद म्हणजे एक संघटनात्मक जबाबदारी आहे. पद हे नावापुरते न घेता जबाबदारीने स्वीकारून काम करावे. पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोच करावेत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावे.
जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड म्हणाले, भाजपमध्ये काम करणाऱ्याला संधी दिली जाते. आज भाजपची ताकद वाढली असून सर्वच पक्ष भाजपच्या विरोधात आहेत. सशक्त पक्ष म्हणून भाजपकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विजय बाबर म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार भाजपचा असेल. भाजपच्या विचारसरणीची लोकं जास्त आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांला संधी द्यावी. उत्तम चौगुले म्हणाले, पदाधिकारी निवडीत माजी सैनिकांचा विचार व्हावा. अनेक माजी सैनिक तळागाळात जाऊन करण्यासाठी इच्छुक आहेत.
0 Comments