किराणा दुकानदारांनी व इतर व्यवसायिकांनी गर्दी टाळण्यासाठी लाईन आऊट आखून व्यवहार करावा- गटविकास अधिकारी राऊत
सांगोला (जगन्नाथ साठे)- सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच,ग्रामसेवक,तलाठी यांना कोविड--१९ या विषाणू पासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पासून संपूर्ण देश लॉक डॉऊन झाल्याची घोषणा केल्यानंतर तालुक्यातील नागरिकांनी किराणा दुकानात किराणा घेण्यासाठी एकच गर्दी केली, ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सर्व किराणा दुकानदारांना आणि इतर व्यावसायिकाना गर्दी टाळण्या
साठी सामाजिक अंतर (Social distance ing) राखण्यासाठी आवाहन केले. त्या आवाहनाला तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या किराणा दुकानदारांनी आज चांगला प्रतिसाद दिला, त्यामध्ये लक्ष्मीनगर,कडलास,गायगव्हान, कमलापूर,महुद,यलमार मंगेवाडी, निजामपूर, मेडशिंगी,बलवडी आदि गावातील दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर पांढऱ्या खडूनी आणि रांगोळी काढून लाईन आऊट टाकून व्यवहार केला.त्यामुळे गर्दी कमी झाली.तर संगेवाडी,घेरडी,कटफळ आदी गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली.
या पुढील काळात ही ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या किराणा ,मेडिकल दुकानदारांनी अशीच पाच फुटांवर लाईन रेषा आखून गर्दी टाळावी,पैसे देताना आणि घेतानाचा व्यवहार झाल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन ही गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी नागरिकांना केले आहे.
0 Comments