सोलापुर-पुणे महामार्गावर वाहनांना नाकाबंदी
कोरोनापासून संसर्ग टाळण्यासाठी कडक उपाययोजना सुरू
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे व संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून टेंभुर्णी पोलिसांनी भिमानगर येथे पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी सुरू केली असून पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची दुचाकीची पोलिस व आरटीओ यांच्या वतीने संयुक्तपणे कसून तपासणी करूनच वाहने पुढे सोडण्यात येत आहेत.
कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे.लोकांना अनेकवेळा घरीच बसा,गर्दी करू नका असे वारंवार सांगून ही नागरिक ऐकण्याचे नाव घेत नाहीत.यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली असून दक्षतेचे सर्व उपाय राबविण्यात येत आहेत.याचाच भाग म्हणून मंगळवारी सकाळ पासून पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर भिमानगर(ता.माढा) येथे भीमा नदीच्या तीरावर बॅरेकेटस लावून पुणे जिल्ह्यातून आलेली सर्व वाहने मालट्रक,जिप,कार,टेम्पो,दुचाकी अशी सर्व वाहने थांबवून वाहनांची व त्यामधील वाहनांची झडती घेतली जात आहे.योग्य कारण असेलतरच वाहनांना प्रवेश दिला जात आहे.विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे हात तपासून कोरोटाईन केले आहे का?हेही काळजीपूर्वक तपासले जात आहे.यासाठी याठिकाणी पोलीस आरटीओ,आरोग्य विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी तपासणीचे काम करीत आहेत.
याठिकाणी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र मगदूम,आरटीओ संदीप मुरकुटे,पोकॉ संतोष मखरे,समी कुडपणे,पोहेकॉ अजित उबाळे,पोकॉ हरिष भोसले,पोकॉ गोविंद बचुटे,तलाठी एम.एस.राऊत,आरोग्य विभागाचे यु.एस.मोरे,डी.एस.झेंडे हे कर्मचारी वाहन तपासणीचे काम करीत आहेत.
भिमानगर येथील नाकाबंदीस उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी ज्योती कदम यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी त्यांना माहिती दिली.त्यांच्या समवेत टेंभुर्णी मंडलच्या मंडल अधिकारी मनिषा लकडे,तलाठी प्रशांत जाधव,तलाठी श्रावण भोई हे उपस्थित होते.प्रांताधिकारी कदम यांनी टेंभुर्णी शहरातून फेरफटका मारून बंदची पाहणी केली.
0 Comments