Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत...

कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत

मुंबई |  कोरोनाने आपल्या देशासह सर्व जगभरात हैदोस मांडला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. त्यासोबत मोठमोठे उद्योगपती, अभिनेते मदत म्हणून देणगी देत आहेत. अशातच राज्यातील देवस्थानांनी देखील मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
       शिर्डीच्या साईबाबा मंदिर समितीने कोरोनाच्या भयान संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी  सरकारचे हात बळकट करण्यासाठी 51 कोटी रूपयांची भरघोस मदत केली आहे.  देवस्थानाने प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत हा निधी शासनाला देण्याचं ठरवलं आहे.
            दुसरीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर प्रशासनाने देखील 2 कोटी रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. राज्य अडचणीत असताना जबाबदारी ओळखून मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
            दरम्यान, मुंबईतल्या लालबागचा राजा तसंच सिद्धीविनायक गणेश मंदिरांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. तसंच सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रेटी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत देत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments