पेट्रोल-डिझेल विक्रीवरील बंदीबाबतचे सुधारीत आदेश जारी
जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवांसह
अकरा प्रकारच्या वाहनांना सवलत
सोलापूर दि. 27: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपधारकांना पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र या बंदीतून जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे वाहनांसह विविध प्रकारच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. याबाबतचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.
या आदेशात नमूद केल्यानुसार खालील वाहनांना सवलत देण्यात आली आहे.
1) जीवनावश्यक वस्तू (उदा. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस विक्री केंद्र, किराणा, दूध, पाणी , गॅस इत्यादी)
यांचा पुरवठा करणारी वाहने.
2) अत्यावश्यक सेवा (उदा. औषध, रुग्णालये, आरोग्य, किड नियंत्रण विषयक सुविधा, वस्तु व कृषी उत्पादनावर
प्रक्रिया करणा-या कंपनी/कारखाने/उद्योग/व्यवसाय इत्यादी) यांचा पुरवठा करणारी वाहने.
3) सर्व वैद्यकीय सेवा पुरविणारे खासगी /शासकीय डॉक्टर्स/कर्मचारी.
4) कायदेशीर कर्तव्य बजावीत असणा-या अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन.
5) कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणा-या शासकीय/खासगी वाहने.
6) सर्व बँक कर्मचारी, बँक व संलग्न वित्तीय संस्था यांची वाहने.
7) शेती उपयोगी शेतकल्यांचे ट्रॅक्टर, पिकावरील फवारणीचे यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्र इत्यादी.
8) साखर कारखान्यांची शेतमाल वाहतुकीची यंत्रसामुग्री.
9) वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.
10) कृषी निगडीत यंत्रसामुग्री.
11) प्रसार माध्यमे , पत्रकाराची वाहने ( ओळखपत्र दाखवल्यानंतर ).
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्यये तसेच भारतीय दंडसहिंता 1860 चे कलम 188 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
0 Comments