Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना बाबतच्या माहितीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना ; कामकाज 24x7 सुरू राहणार

कोरोना बाबतच्या माहितीसाठी
जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना
कामकाज 24x7 सुरू राहणार
               
                सोलापूर दि. 27 : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी  जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे. संजय गांधी योजनेचे तहसिलदार किरण जमदाडे (9850762034) यांच्या पर्यवेक्षणाखाली या कक्षाचे कामकाज 24x7 सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले.
            सोलापूर जिल्हा आणि शहर परिसरात कोरोना विषाणू संसर्ग याबाबत नागरिकांना काही अडचण अथवा तक्रार नोंदविण्याची असेल तर या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक  0217-2731012 असा आहे.
            या कक्षात सहा कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कर्मचा-यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवू नये. वेळेपूर्वी कामावर उपस्थित राहवे, असे आदेशात नमूद केले आहे.
            नियंत्रण कक्षात नियुक्त केलेल्या कर्मचा-यांची नावे व संपर्क क्रमांक :- 
वार
वेळ
कर्मचारी नाव व संपर्क क्रमांक

सोमवार, बुधवार,
शुक्रवार 
रविवार
सकाळी सहा ते दुपारी दोन
श्री. ए. एम. शेख, वरिष्ठ लिपिक, (8855832854)

दुपारी दोन ते रात्री दहा
श्री. आर. के. गुरव, वरिष्ठ सहाय्यक (9822209293)
रात्री दहा ते सकाळी सहा
श्री. पी. एस. बिराजदार, वरिष्ठ सहाय्यक ( 9890611656)

मंगळवार,
गुरुवार
शनिवार
सकाळी सहा ते दुपारी दोन
श्री. एस.बी. पौळ, वरिष्ठ सहाय्यक (9960094389)
दुपारी दोन ते रात्री दहा
श्री. डी. व्ही. राठोड, वरिष्ठ सहाय्यक ( 9284263133)
रात्री दहा ते सकाळी सहा
श्री. पी. के. देवळे, कनिष्ठ सहाय्यक (8888430120)

            राखीव कर्मचा-यांची नावे पुढीलप्रमाणे - श्री. राजीव गाडेकर, कनिष्ठ लिपिक ( 9421060943), श्री.  वि. या. 
आखाडे, कनिष्ठ लिपिक (9763975030) आणि  श्री. व्ही. सी. शेंडगे, कनिष्ठ लिपिक (8625931714).
Reactions

Post a Comment

0 Comments