Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर येथील मुस्लिम भगिनी आणि बांधवांच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर येथील मुस्लिम भगिनी आणि बांधवांच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत अनेक मुस्लिम सरदारांनी आपलं योगदान दिले आहे, अनेक महत्त्वाच्या कामगिरीत मुस्लिम सैन्यानी आपलं रक्त वाहिलं आहे. स्वराज्यात धर्म वा जातीभेदाला थारा नव्हता, कुराण हा अस्मानी किताब आहे त्याचा आदर राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा संदेश आपल्या सैनिकांना दिलेला होता. आजच्या पिढीला हा सामाजिक समतेचा वारसा कळण्यासाठी अश्या उपक्रमांची गरज आहे असे मत मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी व्यक्त केले. NRC आणि NPR च्या‌ विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या  भगिनींही या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या होत्या. सदरच्या शिबिरात 224 रक्तदात्यानी रक्तदान केले.  या प्रसंगी नगरसेवक तौफिक हत्तूरे , जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा निर्मला शेळवणे, कार्याध्यक्षा मनिषा नलावडे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शाम कदम, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष फारुख शेख, शहराध्यक्ष माजी मतीन शेख , गुरफान इनामदार, खालिक मंन्सूर , अशपाक बागवान , अल्ताफ लिंबूवाले आदी बंधू भगिनीं उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments