शिवतेजसिंह यांचा मोठया उत्साहात वाढदिवस साजरा
अकलूज ( प्रतिनिधी )तेजस्वी विचारांचे नवचैतन्य म्हणून ओळखले जाणारे अकलूज ग्रामपंचायतीचे युवा सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला असून, सामाजिक, राजकीय, सहकारी, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरा बरोबरच विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे निवासस्थानी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. शिवतेजसिंह मोहिते पाटील हे प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावरती विराजमान असताना वयाच्या १५ व्या वर्षी सहकार महर्षी यांच्या विचारांची शिदोरी घेऊन, शिवकीर्ति युवा मंचामार्फत लोककल्याणाचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास घेतला आणि अकलूजच्या राजकीय अशा पवित्र भूमीतून कर्तुत्वान कार्याचा कहर करीत असताना, अकलूजच्या सरपंचपदी ते विराजमान झाले. त्यांनी अकलूजच्या विकासाचा आलेख उंचावत ठेवलाच परंतु गावच्या विकासासाठी सतत प्रयत्न करीत राहिले. यामुळेच सामान्य, सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा प्रचंड मोठा ठसा उमटला. तर निर्मळ, निष्पाप व्यक्तिमत्व... समानता आणि समदृष्टीपणाचे प्रतिक... सौजन्य आणि नम्रतेची प्रसन्न भावमुद्रा...सर्वगुणसंपन्न युवा नेर्तृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अखंड दिवस त्यांचेवरती शुभेच्छांचा वर्षाव झाला.
0 Comments