Hot Posts

6/recent/ticker-posts

माढेश्वरी बँकेच्या वतीने नेञशस्ञक्रिया केलेल्या 405 रूग्णांची तपासणी

माढेश्वरी बँकेच्या वतीने  नेञशस्ञक्रिया केलेल्या 405 रूग्णांची तपासणी


पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी केली तपासणी ;आ. बबनदादा शिंदे यांचीही उपस्थिती माढा / प्रतिनिधी- - माढेश्वरी अर्बन बँक व  विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशिय सांस्कृतिक मंडळ निमगांव (टें),विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना,जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत माढा येथील नेञरोग शिबिरामध्ये  शस्ञक्रिया केलेल्या 405 रूग्णांची तपासणी कुर्डूवाडी येथील शासकीय रूग्णालयात जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिणी पारेख यांनी 16 फेब्रुवारी रोजी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यापूर्वी बँकेचे चेअरमन आ. बबनदादा शिंदे व व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत यांनी  सांगितल्याप्रमाणे माढा येथे नेञशस्ञक्रिया केलेल्या रूग्णांची 16 फेब्रुवारी रोजी पहिली तपासणी झाली आणि 16 मार्च रोजी पुढील दुसरी तपासणी होणार आहे. तपासणी केलेल्या रूग्णांना स्पष्टपणे पुन्हा एकदा नव्याने हे जग पाहण्याची संधी मिळाल्यामुळे नेञशस्ञक्रिया केलेल्याे रूग्णांनी डाॅ. तात्याराव लहाने व डाॅ. रागिनी पारेख आणि आ.बबनदादा शिंदे यांचे आभार मानले.या रूग्णांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता तर काही गोरगरीब कुटुंबातील रूग्णांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंद अश्रू आल्याचे दृश्य पहायला मिळत होते.आत्तापर्यंत हजारो गोरगरीब व गरजूंना या मोफत नेञशस्ञक्रिया शिबिराचा फायदा झाला आहे.  याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिणी पारेख यांनी नेञशस्ञक्रिया केलेल्या रूग्णांची पाहणी व जातीने विचारपूस करून काही आवश्यक सुचना आणि घ्यावयाच्या खबरदारी बाबत मार्गदर्शन करताना तंबाखू व दारु आणि इतर कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे,माजी उपसभापती दादासाहेब तरंगे,नेत्रचिकित्सक गणेश इंदुरकर,वैद्यकीय अधीक्षक डाॅ.संतोष आडगळे,डॉ.अशोक मेहता,डॉ.नंदकुमार घोळवे,डॉ. शशिकांत त्रिंबके,निलेश कुलकर्णी,प्रा.संजय साठे, डी.व्ही.चवरे,ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गोसावी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,लक्ष्मण राऊत,रवींद्र शिंदे, दिलीप लामगुंडे,श्रीकांत कुलकर्णी,सौदागर गव्हाणे, दत्तात्रय जुगदार यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. 
Reactions

Post a Comment

0 Comments