नेत्रदान, देहदान व अवयवदान जनजागृती रॅलीच्या नियोजनासाठी बैठक संपन्न; उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला येथील विविध सामाजिक संघटना तसेच शाळा, कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला शहरात नेत्रदान, अवयव दान व देहदान यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सोमवार दि.27 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
रॅलीचा शुभारंभ सांगोला शहरातील शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये शहरात कार्यरत असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना, पतंजली योग समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राजमाता प्रतिष्ठान, माणुसकी प्रतिष्ठान, चैतन्य हास्य योग या संघटनांचे सदस्य तसेच शहरातील सर्व शाळा, कॉलेजचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत. महात्मा फुले चौकातून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप सांगोला विद्यामंदिर प्रशालेत होणार असून नेत्रदान, अवयवदान व देहदानविषयी माहिती व अल्पोपहार देऊन करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सांगोला शहरातील नागरिकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन या उपक्रमात सहभागी असलेल्या विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments