भटक्या विमुक्त जमातीतील मुलांना नवीन कपडे भेट देवून संक्रांत साजरी
सांगोला (प्रतिनिधी) उषा युनिफॉर्म सोलापूर प्रायोजित व उत्कर्ष शिक्षण व समाजसेवा संस्था सोनंद आयोजित भटक्या विमुक्त जमाती जातीतील मुलांना नवीन कपडे भेट देवून संक्रांतीचा साजरा केला. हा कार्यक्रम जाई जुई गारमेंट , संभाजीराजे चौक,जत येथे संपन्न झाला.
या वेळी संस्थेचे संस्थापक शाम पवार यांनी प्रास्ताविकातून ग्रामीण व शहरी भागातील गारुडी, पारधी , गोल्यारी, भामटा समाजातील लोकांना आत्मसन्मान व आत्मनिर्भर होऊन इतर समाजा बरोबर समानतेने संधी निर्माण करण्यासाठी उषा युनिफॉर्म सोलापूर व उत्कर्ष संस्था काम करत आहे , त्याचाच एक भाग म्हणून या समाजातील १२८ मुलांना नवीन कपडे मोफत वाटून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हा कार्यक्रम राबविला असल्याचे सांगितले.
या विशेष उपक्रमासाठी जत तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास माने, प्रमुख पाहुणे कार्यसम्राट नगरसेवक विजय ताड, प्रमुख उपस्थिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बनसोडे, मिथुंनजी माने, सितारामजी गायकवाड उपस्थित होते.या वेळी प्रमुख पाहुणे ताड म्हणाले की " मागासले पणाची झुल झटकायची असेल तर मुलांना नियमित शाळेत पाठवा त्याच प्रमाणे मुलांसाठी नगरपालिकेच्या अनेक योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घ्यावा,शिक्षणाचे महत्त्व पटवून द्या,असे आवाहन केले. तर
कार्यक्रमाचे अध्यक्ष माने यांनी उपक्रमाचे कौतुक करत शासनाचा व गरजवंत यांच्यातील दुवा व्हा. असे सुचविले. या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष शाम पवार, प्रवीण पवार, सागर काळे, युवक कार्यकर्ते अमर माने, गजानन व्हणमने, मोरे सर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments