सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे अग्नि सुरक्षा विषयावर एकदिवसीय चर्चासत्र व प्रात्यक्षिके संपन्न
महाविद्यालयात 21 जानेवारी रोजी रेड अलर्ट फायर सिस्टिम या कंपनी मार्फत श्री. जी. एम. दिवटे यांचे अग्नि सुरक्षा या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र व प्रात्यक्षिके उत्साहात संपन्न झाले. या एकदिवसीय चर्चासत्रामध्ये श्री जी. एम. दिवटे सरांनी अग्निमुळे आतापर्यंत देशात झालेल्या मोठया दुर्घटना व त्यामुळे झालेली हानी छायाचित्राद्वारे सांगितली. अग्निपासून पर्यावरण, निसर्ग, मनुष्य, प्राणी व मालमत्ता यांची हानी कशी रोखावी व हानी होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहीती दिली. अग्नि सुरक्षेचे विविध पर्याय व उपकरणे उदाहरणासहित सांगितले. सरांनी सर्व विद्यार्थी व कर्मचारींना अग्नि सुरक्षेची उपकरणे याबद्दल प्रात्यक्षिकासहीत माहिती दिली.
प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करत असताना अग्निपासून विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी व अग्निशमन उपकरणे कसे हाताळावे व आपत्कालीन परिस्थितीत कसे सुरक्षित रहाता येईल याबद्दल संपूर्ण माहिती दिली. या चर्चासत्रामध्ये सरांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण केले. सरांनी महाविद्यालयाने राबविलेली अग्नि सुरक्षा व उपकरणे याबाबत प्रशंसा केली.


0 Comments