सोलापूर जिल्ह्यात कलम37 (1) व (3) लागू
सोलापूर दि. 21 :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी महाराष्ट्र पेालीस अधिनियम 1951 चे कलम 37(3) लागू केले आहे. हा आदेश 31 जानेवारी 2020 पर्यंत लागू राहील. या आदेशान्वये पाच किंवा पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा, शासकीय कामकाज करणा-या यंत्रणांना लागू होणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. वरील कालावधीत पोलीस अधिनियम 1951 चा कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे. हा आदेश 31जानेवारी 2020 पर्यंत लागू राहील. या आदेशानुसार शस्त्रे, तलवार, काठी, सुरा, अशी वस्तू बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

0 Comments