युवकांनी आता उद्योगाकडे वळावे
सोलापूर : युवकांनी छोट्या-मोठ्या व्यवसायात उतरुन व्यवसायाची वृध्दी केल्यास जीवन सार्थक ठरेल. तसेच श्री स्वामी समर्थ, सिध्दरामेश्वरांच्या नावाने मार्केटिंग केल्यास भाविकांमध्ये वाढ होऊन कामगारांच्या हाताला काम मिळेल आणि आर्थिक सुबत्ता येईल, असे सांगून आपल्या संकल्पनेतील व्यवसायास सोलापूर सोशल फाऊंडेशन मदत करण्यास कायम तयार असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृह येथे सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून स्नेहसंवादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, यशवंत धोंगडे, अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, बाबासाहेब निंबाळकर, नगरसेवक महेश हिंडोळे, डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले आदी उपस्थित होते. आ.देशमुख म्हणाले, युवकांनी उद्योग करताना एकाच प्रकारची वस्तू उत्पादन केल्यास आपल्या गावचे नाव नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही. तालुक्याला पुढे नेण्याचे कार्य सोलापूर सोशल फाऊंडेनच्या माध्यमातून करावे. कुटीर व्यवसाय, पशुपालन आदी व्यवसायात युवकांनी उतरावे. याकामी आर्थिक, सामाजिक मदतीची गरज भासल्यास सोशल फाऊंडेशन मदतीला धाऊन येईल. यावेळी याप्रसंगी उपस्थित युवक व नागरिकांनी सोलापूरचे ब्रॅडींग व मार्केटिंगबाबत आ.सुभाष देशमुख यांच्याशी थेट संवाद साधला. प्रास्ताविक काकासाहेब चौगुले यांनी केलेे तर सूत्रसंचलन व आभार नितीन पाटील यांनी मानले.


0 Comments