Hot Posts

6/recent/ticker-posts

एखतपुर ते मठवस्ती- बागलवाडी पर्यंतचा रस्ता दुरुस्त ,मनसेच्या आंदोलनास यश .

एखतपुर ते मठवस्ती- बागलवाडी पर्यंतचा रस्ता दुरुस्त ,मनसेच्या आंदोलनास यश .


सांगोला/प्रतिनिधी - एखतपुर ते मठवस्ती- बागलवाडी पर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाल्याने सदर रस्ता दुरुस्त करून मिळावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष अक्षय विभुते यांनी कार्यकर्त्यांसमवेत धरणे आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विभागीय उपअभियंता यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन माघे घेण्यात आले. यावर दैनिक सांगोला सुपरफास्ट या वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच मनसेच्यावतीने पाठपुरावा केला असता अवघ्या तीन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
                      एखतपुर ते मठवस्ती (बाग़लवाड़ी) ला जोडणाऱ्या रस्त्यावरुन अनेक प्रवासी ये जा करीत आहेत. परंतु मागील अनेक महिने व दिवसापासून एखतपुर ते मठवस्ती (बाग़लवाड़ी) या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. यामध्ये अनेकांना दुखापत झाली आहे. तसेच वाहनधारकांच्या वाहनांची नुकसानी मोठ्याप्रमाणात झाल्याची बाब आहे. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देऊन रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यासंदर्भात मागणी केली होती. यावर संबंधित प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. व या आंदोलनाची बातमी सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनेल नी होती. सदर आंदोलनाची व  बातमीची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभागाने तीन महिन्यात रस्त्याच्या काम पूर्ण करून या भागातील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.
                             सदर आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, उद्योगपती योगेश खटकाळे यांनी भेट दिली होती.आंदोलना ता.उपाध्यक्ष मनसे सांगोला, मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे आविनाश बनसोडे ता.अध्यक्ष मनविसे सांगोला, प्रवीण सावंत कार्य अध्यक्ष लोटवाडी, आकाश सावंत, किरण बोडरे लोटवाडी, विकी सावंत, संतोष साठे, नौशाद मुलानी, बापू वलेकर ता.उपाध्यक्ष मनविसे सांगोला, विशाल गोडसे, अनिल केदार, विनोद भोसले, ओंकार शिंदे ता.उपाध्यक्ष मनविसे सांगोला, महेश अनुसे शाखा प्रमुख मनविसे कमलापुर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते. तालुकाध्यक्ष अक्षय विभूते यांनी आंदोलनादरम्यान सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे आभार मानले आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments