Hot Posts

6/recent/ticker-posts

आचार विचार आणि उच्चार या पातळीवर ब्रह्मचर्य महात्मा गांधीना अपेक्षीत होते. प्रा.विष्णू सुर्वे

आचार विचार आणि उच्चार या पातळीवर ब्रह्मचर्य महात्मा गांधीना अपेक्षीत होते. प्रा.विष्णू सुर्वे
 

अकलूज(प्रतिनिधी)  शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज राज्यशास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व्याख्यानात प्रा.विष्णू सुर्वे  बोलत होते.
   शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विचार परीक्रमेतील चवथे विचार पुष्प गुंफताना ते बोलत होते. काया वाचा मने ब्रह्मचर्य गांधीजींना अपेक्षित होते   गांधीजींनी ब्रम्हचर्य का स्विकारले..? वडीलांचे अंतीम दर्शन होऊ शकले नाही याचा त्यांना पश्चात्ताप झालेला होता, स्त्रिया आंदोलनात सहभागी झाल्या शिवाय आंदोलन सफल होऊ शकत नाही ....त्यांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी ब्रह्मचर्य पाळले गेले पाहिजे यासाठी गांधीजींनी सर्व कांग्रेस कार्यकर्त्यांना ब्रह्मचर्याची शपथ घ्यायला लावली. माणसाने प्रगती केली ‌...पण त्याने विषय वासने मध्ये अडकून रहाता कामा नये यासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे असे गांधीजी म्हणत. शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी ही ब्रह्मचर्य आवश्यक आहे असेही गाधीजी म्हणत. श्रमाची प्रतिष्ठा गांधीजींनी पाळली आणि सरदार पटेल सारख्या माणसांना पाळायला लावली, तामस आहार टाळला, मनावर ताबा मिळवण्यासाठी उपवास करावा असे ते म्हणत आजच्या पिढीने स्वत:च्या आचरणाच्या नियंत्रणासाठी गांधीजीच्या ब्रह्मचर्याचा विचार घेतला पाहिजे. कारण आज माणसांना रक्ताची नाती सुद्धा कळेना झाली आहेत म्हणून गाधी विचार सांगावा लागतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विश्वनाथ आवड यांनी केले. 
                या कार्यक्रमासाठी डाॅ. अपर्णा कुचेकर, डाॅ बाळासाहेब मुळीक, डाॅ. विशाल साळुंखे, रविराज लव्हाळे, प्रा बाळासाहेब साळुंखे, डाॅ चंद्रशेखर ताटे देशमुख , डाॅ गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.
  कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन  कुमारी शितल कोकाटे हिने केले तर आभार कुमारी नेहा कोरे हिने मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments