दलित महासंघाच्या वतीने लोटांगण आंदोलन
दि 27/1/2020 अकलूज (प्रतिनिधी) महाराष्ट्रात मातंग समाजावरील
अन्याय अत्याचाराचे प्रचंड प्रमाण वाढलेले असून या महाराष्ट्राच्या सरकारने मातंग
समाजाचे संरक्षण करावे त्यांचा विकास दर वाढवा म्हणुन शासनाचे लक्ष वेधून
घेण्यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मच्छिंद्र सकटे साहेब यांच्या
मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे दलित महासंघाचे प म अध्यक्ष राजाभाऊ खिलारे
यांच्या उपस्थितीत,दलित महासंघाचे प म उपाध्यक्ष केरबा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस
तालुका दलित महासंघाचे वतीने अकलूज येथील आंबेडकर चौकातून डॉ बाबासाहेब
आंबेडकरांना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सदुभाऊ चौक मार्गे
प्रांत कार्यालयावर लोटांगण आंदोलन सोमवार दि 27/1/2020 रोजी सकाळी 11-00 वा करण्यात आले सर्व कार्यकतेॅ
लोटांगण घेत होते या लक्षवेधी आंदोलनामुळे सर्व लोकांच्या नजरा त्या आंदोलनावर
होत्या मा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रांत अधिकारी अकलूज यांच्या
वतीने नायब तहसिलदार बनसोडे यांनी निवेदन स्वीकारले अकलूज पोलिस स्टेशनच्या वतीने
चोख बंदोबस्त ठेवला त्यावेळी निवेदनाद्वारे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील
शंकर नगर येथे साईबाबा माध्यमिक विद्यालयात इ सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मातंग
समाजातील विद्यार्थ्यांनीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधम शिक्षकांना फाशी
द्यावी, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न
पुरस्काराने सन्मानित करा, संगमवाडी येथील लहुजी साळवे
यांच्या स्मारकाला त्वरित विशेष अनुदान देऊन स्मारकाचे काम तातडीने चालु करा, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे
व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे मंत्रालयासमोर उभे करण्यात यावेत लहुजी
वस्ताद साळवे आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू कराव्यात या व मातंग समाजाच्या
विविध सामाजिक प्रश्नाविषयीच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत सदर आंदोलन
प्रसंगी दलित महासंघाचे प म अध्यक्ष राजाभाऊ खिलारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
केरबा लांडगे, ता.अध्यक्ष धनाजी साठे,ता.महिला अध्यक्ष रेखाताई खिलारे,नंदा लोखंडे,गणेश लांडगे,बच्चन साठे,संपत खिलारे रामचंद्र खिलारे, शामराव सकट, तानाजी साठे,अजय गायकवाड, गणेश साठे,राजु जाधव,चंद्रकांत गायकवाड,उपस्थित होते त्यावेळी विविध
सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला .तसेच महीला बहुसंख्येने उपस्थित
होत्या.

0 Comments