शिवशंकर बझार मध्ये तांदूळ मोहत्सव व हळदी कुंकू समारंभ
अकलूज : ग्रामीण भागातील ग्राहकांचे आकर्षण ठरलेल्या शिवशंकर बाझार
मध्ये तांदूळ मोहत्सवाचे उदघाटन शिवशंकर बाझार च्या चेअरमन मा. स्वयंप्रभादेवी उदयसिंह
मोहिते पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात साजरा करणेत आला. यावेळी बाझारचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, व्यस्थापक व
कर्मचारी उपस्तिथ होते. ग्राहकांच्या सोई करीता त्यांच्या पसंदीनुसार तांदुळ खरीदी
करता यावा या साठी शिवशंकर बझार मध्ये तांदुळ मोहत्सव साजरा करणेत येतो. या तांदूळ मोहत्सव मध्ये
महाराष्ट्रातील व बाहेरील राज्यातील नामाकींत कंपन्यांचे विविध 40 प्रकारचे तांदुळ माफक दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले
असून हा तांदुळ मोहत्सव दिनांक 31
मार्च 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. या तांदुळ
मोहोत्सवचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर
सालाबादप्रमाणे शिवशंकर बझारच्या वतीन तालुक्यातील सतत च्या धावपळीच्या जीवनात
महिलांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने या ही वर्षी बझार मार्फत पिलीव, नातेपुते, नेवरे, श्रीपूर, वेळापूर या सर्व
बझारच्या शाखा मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमा मध्ये फनी गेम्स, उखाणे, भावगीत या स्पर्धे
चे आयोजन केले होते सदर स्पर्धे मध्ये विजेते ठरलेल्या महिलांना खास बक्षिसे देण्यात
आली. शनिवारी दिनांक 1/02/2020
रोजी रथसप्तमीचे औचित्य साधून अकलूज येथे
मुख्य शाखेमध्ये हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीजास्त महिलांनी सहभागी व्हावे असे
आव्हान बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

0 Comments