विकास कामांचा आजबार्शी तालुक्यांत आढावा
सोलापूर दि. 28 : बार्शी तालुक्यातील सर्व शासकीय कामकाजाची आढावा बैठक, बुधवार, 29 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता कै. मामासाहेब जगदाळे सभागृह, बार्शी नगरपरिषद, बार्शी येथे उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांचे उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, पिक कर्जमाफी, शेतक-यांना देण्यात येणारे विविध अनुदान, पाणीटंचाई आढावा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, रोजगार हमी योजना, एमएसईबी कंपनीकडील विविध कामांचा आढावा, विविध पाझर तलाव व सिमेंट बंधारे यांचा आढावा, विविध रस्त्यांचे संदर्भात सद्यस्थितीची माहिती, कृषी विभागाकडून राबविल्या जाणा-या विविध योजनांचा आढावा व कायदा व सुव्यवस्था, भूसंपादनाचे विविध बाबींवर आढावा बैठकीत चर्चा होणार आहे. सदर बैठकीस तालुक्यातील सर्व संबंधित अधिका-यांनी उपस्थित रहावे असे, तहसीलदार बार्शी यांनी कळविले आहे.

0 Comments