राष्ट्रीय मानवाधिकार
संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर : विजापूर रोड, सुंदरमनगर येथील स्वामी
समर्थ मंदीर परिसरात राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गिरीराज नर्सरी स्कुल
व स्वामी समर्थ सेवाभावी संस्था, यांच्या संयुक्त
विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा
करण्यात आला. यावेळी सौ. जान्हवी माखीजा संस्थापक सुमेद फौऊंडेशन यांच्या हस्ते ध्वजवंदन
करण्यात आले. यावेळ मा. पंडित गायकवाड - रेल्से मुख्य तिकीट तपासणीस, श्रीशैल लिगाडे - परिवहन व्यवस्थापक, म.न.पा. सोलापूर, संजोग सुरतगांवकर –जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार
संघटना, अॅड. अर्जुन अष्टगी तसेच
श्रीकांत चपळगांवकर – संचालक गिरीराज नर्सरी स्कुल व
तसेच स्वामी समर्थ ट्रस्ट मंडळ, गिरीरराज नर्सरी स्कुल शिक्षक - पालक, परिसरातील नागरिक, भाविक विद्यार्थी उपस्थित
होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
लक्ष्मीकांत चपळगांवकर यांनी केली, तर आभार संजोग सुरतगांवकर यांनी मानले.
ध्वजवंदनानंतर उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी शिवम धुळखेडकर, राहुल हुल्ले, प्रतिक कुलकर्णी व गिरीराज नर्सरी स्कुल शिक्षक यांनी
परिश्रम घेतले.

0 Comments