Hot Posts

6/recent/ticker-posts

जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश


जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश



सोलापूर दि. 29 :सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी प्रकरण क्रमांक 2723/2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दि.30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012  या कालावधीत  निर्गमित करण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कामासाठी जात वैधता प्रमाणपत्र केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी जातीच्या दाव्यापृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रासह समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे, आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ‍ समिती सदस्य छाया गाडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ‍ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ‍ समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवन, अब्दुलकर मंगल कार्यालयासमोर, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा असे, आवाहन श्रीमती गाडेकर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments