Hot Posts

6/recent/ticker-posts

हैद्राबाद सारख्या घटना टाळायच्या असतील तर स्वतापासून सुरवात करावी लागेल ...

हैद्राबाद सारख्या घटना टाळायच्या असतील तर स्वतापासून सुरवात करावी लागेल ...
    

[ अकलूज प्रतिनिधी ] - शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज राज्यशास्त्र विभाग व मराठी विभागाचे वतीने आयोजीत हैद्राबाद घटना व पोलीस ऐन्काऊंटर याविषयी आज रोजी महविद्यालयात चर्चासत्र आयोजीत करणेत आले होते त्याप्रसंगी मुलांनी वरील भावना व्यक्त केल्या.
    केवळ ऐन्काऊंटर करून असे प्रश्न मिटणार नाहीत आणि कायदयाचे राज्यामध्ये अशा गोष्टी होणे अपेक्षीत नाही असे विचार मुलांनी मांडले, न्यायव्यावस्थेमधील दिरंगाई, राज्यकर्ता वर्गाकडून केली जाणारी तात्पुरती मलमपट्टी , समाजातली हरविलेली मुल्ये, कुटुंबातील हरवलेला संवाद, अपयशी ठरत असलेली शिक्षण व्यावस्था अशा अनेक गोष्टी समाजात वारंवार अशा घटना घडवून आणण्यासाठी कारणीभूत आहेत पण आपण मुळापासून प्रयत्न करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करतोय त्यामुळे या घटना थांबलेल्या नाहीत अशा भुमीका मुलांना स्पष्टपणे मांडल्या
                           संस्थेचे अध्यक्ष मा जयसिंह मोहिते पाटील व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकासाला चालना मिळण्यासाठी व तात्कालीन घटनांवर मुलांच्या प्रतीक्रीया जाणून घेण्यासाठी अशा चर्चा सत्राचे आयोजन करणेत आलेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा परकाळे यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख मनोगत डाॅ विश्वनाथ आवड यांनी मांडले
                          या चर्चासत्रात खालील विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली रूतूजा कदम, शामबाला क्षिरसागर, शाहीन मुलाणी, हणमंत सांगळे, विक्रम दुपडे, शितल भाबड, शिवाजी शिंदे, श्रध्दा भडंगे, पूजा सुरवसे, रोहित भुईटे, मारुति सुर्वे, महादेव चव्हाण, संग्राम तोरसकर, सुरज ननवरे, कृष्णा जगताप
   चर्चासत्र यशस्वी करणेसाठी मारुति सुर्वे, महादेव चव्हाण, संग्राम तोरसकर, सुरज ननवरे, कृष्णा जगतापव, राज्यशास्त्र विभाग, मराठी विभाग व महर्षि स्पर्धा परीक्षा अँकडमीच्या विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.
Reactions

Post a Comment

0 Comments