शिवनेरी पब्लिक स्कूलमध्ये मुला-मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण
बार्शी प्रतिनिधी -
वारदवाडी चौक उपळाई ठोंगे ता. बार्शी येथील शिवनेरी पब्लिक स्कूल मध्ये मुला-मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी तसेच वारंवार मुली व महिलांवरती होणारे अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी सक्षम बनणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे सारखे प्रशिक्षण देणे बंधनकारक केले पाहिजे. दुसऱ्यावरती विसंबून न राहता वेळप्रसंगी अडचणीच्या काळामध्ये मुलींना व महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करता आले पाहिजे. यासाठी प्रत्येक मुलीने स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिवनेरी पब्लिक स्कूलचे शेळके यांनी सांगितले. यावेळी कराटे प्रशिक्षक महेश मुळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे शिकवले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत होते. या उपक्रमाचे सर्व पालकांतून व ग्रामीण भागातून कौतुक होत आहे. यावेळी शाळेच्या संचालिका मोनिका शेळके, प्राचार्या अंजली घोटाळे, जयश्री जडे, प्रियंका माळी, प्रतिभा नवले, शुभांगी पाटील, पूजा चोबे, गीतांजली देवकते, विठ्ठल जगताप, आश्राब ठोंगे, महेश चोबे, धनंजय कोळी, मीरा कोळी आदी उपस्थित होते.

0 Comments