वडोली कराड चा केटीएम प्रथम : अरणमध्ये श्वान स्पर्धा उत्साहात : पाच जिल्ह्यातील सुमारे 56 श्वान सहभागी
अरण प्रतिनिधी दि .9
अरण ता माढा येथील खंडोबा देवस्थान पंचकमेटी आणि सागर जाधव मित्र परिवाराने आयोजित केलेल्या श्वान स्पर्धेत सातारा येथील गोल्डन ग्रुप यांच्या 'के टी म' व टायगर ग्रुप घरनिकी पारगाव यांच्या 'खडका' या दोन श्वानांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविला .त्यांना अनुक्रमे 15000 रुपये व 10000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक वाई तालुका रेसिंग क्लब यांच्या 'मधुरा' श्वानाने पटकावला.सात हजार रूपये रोख व ट्राॅफी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील ग्रेहाऊंड जातीचे सुमारे 56 श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते.दिडशे मीटर अंतराच्या सुमारे 20 फेरया घेत प्रथम क्रमांक काढण्यात आला.या स्पर्धेचे निवेदन प्रकाशबुवा महागांवकर(सातारा) यांनी केले.
युवा नेते यशवंत दादा शिंदे व किसन अप्पा जाधव, यांच्याहस्ते रोख 15 हजार रूपये,ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी पैलवान सागर जाधव, समाधान जाधव बालाजी रणदिवे महादेव घाडगे,दीनानाथ घाडगे, यशवंत शिंदे, ,सावता घाडगे,दिग्विजय कांबळे,पै.
विठ्ठल मिस्किन, बालाजी शेळके उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यशवंत शिंदे, समाधान जाधव, प्रकाश रणदिवे,दिग्वियज सावंत, दादा कांबळे, बालाजी रणदिवे, पांडुरंग रणदिवे,बालाजी टोनपे,बंडू रणदिवे सतीश ताकतोडे,नवनाथ कांबळे,दिपक पवार यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी तरूणांनी मोठी गर्दी केली होते.

0 Comments