शिक्षण विभाग पुणे व न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला व राजापुर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर ता--सांगोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध कार्यक्रम सादर केले जातात. या कार्यक्रमात गावाचे प्रबोधन,स्वछतेचा जागर केला जातो. प्लास्टिक मुक्ती, महिला सबलीकरण, शौचालय बांधणे व वापरणे, व्यसनाधीनता, तरूणांचे अति मोबाईल वापरणे, पाण्याचे दुर्भिक्ष, अंधश्रद्धा अशा विविध विषयांची जनजागृती प्रसार आणि प्रचार या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून केला जात आहे. या वेळी गावातील नागरिक या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला प्रोत्साहन देत आहेत. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील विद्यार्थ्यांनी गावातीलसमस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हनुमंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी संतोष राजगुरू, कार्यक्रमाधिकारी मिलिंद पवार प्रा. शशिकांत गायकवाड,सरपंच बाबुराव तोडकरी, ग्रामविकास अधिकारी राजकुमार ताटे व स्वयंसेवक परिश्रम घेत आहे.नुकताच दत्तात्रय येडवे गुरुजी यांचा गावासाठी काय पण हा कार्यक्रम पार पडला.

0 Comments