Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वकर्तृत्वाच्या बळावर बना उद्योग सखी - माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख

स्वकर्तृत्वाच्या बळावर बना उद्योग सखी - माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख




उत्तर सोलापूर : महिला ह्या स्त्रीत्वाचा उत्सव, तिच्या आत्मसन्मानाचा उत्सव. कारंबा येथील महिलांना उद्योजकता मार्गदर्शन मेळावा : महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आज सोलापूर येथे   महिलांना मार्गदर्शन देण्यासाठी ४० महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, सरपंच,सदस्यव लोकप्रतिनिधी व गावकरी व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महिलांना रोजगार व व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलताना म्हणाले कि,गेल्या तीन दशकात स्वयंपूर्ण महिलांची संख्या सातत्याने वाढते आहे. पुरुषप्रधान समाजात संघर्षाने स्त्रीने स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण उद्योग क्षेत्रात आजही म्हणावं तसं तिचं अस्तित्व आजही जाणवत नाही आहे.भारतात उद्योग क्षेत्रात स्त्रियांना खूप वाव आहे. आता गरज आहे जास्तीत जास्त स्त्रियांनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याची.
बचत गटांच्या महिलांनी एकत्रित येऊन  कोणत्याही १० वस्तु सुंदर तयार करून प्रथम गावातच विक्रीस ठेवावे. अश्या वस्तू पाहूनच बाहेरील गावातील नागरिक कारंबा येथे यावेत. यामधून महिलांना रोजगार मिळेल. व उत्पन्नात वाढ होईल. व असे हि सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास आप्पा गुंड, इन्नुस शेख, अशोक बहिर्जे,सत्तारभाई शेख, शशिकांत दुधाळ, प्रदीप पाटील व आदि बचत गटाच्या महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments