Hot Posts

6/recent/ticker-posts

भुईंजे ता. माढा येथे रविदास मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना













भुईंजे ता. माढा येथे रविदास मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
  : -माढा तालुक्यातील भुईंजे येथील संत रविदासनगर येथील संत श्री.रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा पंजाब येथील संत श्री रविदास महाराज जन्मस्थान पब्लिक चॅरिटेबल ट्रष्ट चे चेअरमन संत श्री १०८ निरंजनदासजी महाराज तसेच पंजाब येथील पठाणकोट मंदिर येथील संत श्री १०८ गुरुदीपगिरी महाराजजी व सचखंड डेरा बल्ला-जालंदर येथील संत श्री १०८ मनदीप दास जी महाराज यांच्या हस्ते शुभहस्ते रविवारी सकाळी करण्यात आली.  

या कार्यक्रमास संत धनपतदासजी महाराज,ग्यानी मेहेरसिंगजी महाराज,संत रविदास महाराज मंदिर वाराणशी येथील जन.सेक्रेटरी सतपाल बिरदी,ट्रष्टी के.एल.सुर्वाजी,ट्रष्टी निरंजन चिमाजी,ट्रष्टी मास्टर बी.के.मेहता,परमेंदर,देविदास गोत्री,उद्योगपती मोहन कोर्टानी,गोपाल अत्री,शाम लाल,करमचंद भटिंडा,धरमदास,अनिल कुमार,पुणे येथील के.एम.बनसोडे,मोहनलाल,संभाजी वाघमारे आदीजन उपस्थित होते.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संत श्री दिपगिरी महाराज म्हणाले की,महर्षी वाल्मिक ऋषी,संत कबीर,संत नामदेव यांच्या प्रमाणे सतगुरु श्री संत रविदास महाराज यांचाही इतिहास खूप सखोल आहे.सर्व कुटुंबाने प्रत्यक्ष कामास दिल्यास व मिळून कोणतेही काम निष्ठापूर्वक केल्यास काहीही कमी पडणार नाही.
संत श्री मनदीप दास यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,सर्व संत रविदास महाराज यांना सर्व संतामध्ये संत शिरोमणी हा किताब मिळालेला आहे.यावरून संत रविदास महाराज यांच्या महान कार्याची आपणास कल्पना येईल.संत रविदास महाराज हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे सर्वात जास्त चमक असणारे व प्रकाशमय आहेत.संपूर्ण समाजात जातीपातीचा रोग पसरला असून सर्वजण या रोगाने संभ्रमात आहेत.मात्र संत रविदास महाराज यांनी सर्वांना फक्त परिधान करण्यासाठी कपडा,खाण्यासाठी अन्न व राहण्यासाठी मकान मिळाले पाहिजे अशी माफक अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदीर समितीचे मुख्य प्रवर्तक राजाभाऊ शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.निवृत्ती लोखंडे यांनी केले.

यावेळी संत १०८ निरंजनदास महाराज,संत १०८ गुरूदिपगिरी व संत १०८ मनदीपदास महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टेंभुर्णी ते भुईंजे अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.तसेच महाराजांच्या हस्ते संत रविदास महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन,संत रामानंद महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,डॉ.दिलीप गुजर,रामहरी लोखंडे,अनिल कांबळे,अशोक शिंदे,राजू गुजर,बंडू खडतरे,रावसाहेब लोंढे,दादा लोंढे,आप्पा लोंढे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास परिसरातील गावातून समाज बांधव उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments