Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडीअम स्कुलच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी कु.साहिल सुतार,विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी कु.वैष्णवी गावडे यांची निवड.










सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडीअम स्कुलच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी कु.साहिल सुतार,विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी कु.वैष्णवी गावडे यांची निवड.


सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या स्नेहसंमेलनाचा भाग म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवड पार पडली. ही निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे शाळेत संपन्न झाली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता 9 वी मधील कु. साहिल अमुलाल सुतार याची तर विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून इयत्ता 9 वी मधील कु. वैष्णवी अंकुश गावडे हिची निवड झाली.
   सदरची निवडणूक प्रक्रिया अतिशय काटेकोर आणि पारदर्शकपणे पार पडली. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व कळावे त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी. लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व लक्षात यावे या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेद्वारे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवड करण्यात आली.
सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण 18 उमेदवार होते. यामध्ये इ.3 री ते इ. 10 वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यासाठी विद्यालयामध्ये मतदान कक्ष तयार करण्यात आला. या मतदान प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांनी काम पाहिले तसेच केंद्राध्यक्ष म्हणून श्री. विशाल काळे सर व श्री.प्रशांत बुरांडे सर यांनी मतदान अधिकारी म्हणून श्री. दिग्विजय चव्हाण सर श्री.सुभाष निंबाळकर सर, कु. रेणुका माने मॅडम यांनी तर सेवक म्हणून श्री सुहास डांगे यांनी काम पाहिले.
विद्यालयातील सर्व शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments