अपयशाला यशाच्या नजरेने सकारात्मक पाहणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र-शुभाली मोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2019

अपयशाला यशाच्या नजरेने सकारात्मक पाहणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र-शुभाली मोरे

अपयशाला यशाच्या नजरेने सकारात्मक पाहणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र-शुभाली मोरे 


पंढरपूर /प्रतिनिधी ; अपयशाला यशाच्या नजरेने सकारात्मक पाहणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे असे प्रतिपादन कु.शुभाली मोरे यांनी केले. वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली येथे आयोजित सत्कार सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या त्यांची हेलकॉन कंपनीत ३५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळून एरॉनॉटिकल इंजिनिअर पदी निवड झालेबददल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन जिदद व कठोर परिश्रम घेतले तर यश निश्‍चित मिळते. स्वतःचा पाया भक्कम केला तर यशाची शिखरे सर करता येतात. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली मानसिकता बदलून स्पर्धेच्या युगात टिकुन राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने प्रगती करावी.या कार्यक्रमास  श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे, जालींदर मोरे, विलास पासले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेबददल वसंतराव काळे प्रशालेतील खेळाडू प्रीती काळे, अमृता माने, संध्या सुरवसे, शिवानी यड्रावकर, यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य एच.आर.जमदाडे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा.एस.एस.काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages