स.म.२लाख१ व्या साखर पोत्याचे पूजन व १ कोटी वीज विक्री युनिटचे पूजन.
अकलूज ( विलास गायकवाड) येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन२०१९-२०२० च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या २ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते तर बगॅसवर आधारित ३३ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प म्हणून एक्सपोर्ट केलेल्या १ कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा सीजन२०१९-२०२० चा ऊस गळीत हंगाम दि.२४-११-२०१९ रोजी सुरू झाला असून दिनांक २५-१२-२०१९ अखेर २ लाख २४ हजार ८३८ मे. टन उसाचे गाळप होऊन २ लाख १८ हजार ४०० साखर पोत्यांचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९. ८६% व आजचा साखर उतारा १०.९० टक्के आहे. सध्या प्रति दिन ७५०० उसाचे गाळप होत आहे. तसेच को-जनरेशन प्रकल्पांमध्ये दिनांक २४-११-२०१९ पासून २५-११- २०१९ अखेर १ कोटी ९० लाख ४१ हजार ८८६ युनिट वीज निर्माण होऊन १ कोटी १७ लाख ६८ हजार ९७९ युनिट वीज एक्सपोर्ट केलेले आहे.
तसेच चालू सीझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिसलरी मध्ये दिनांक २५-१२-२०१९ अखेर १७ लाख २० हजार ९१० लिटर रेक्टीफाईड स्पिरिट तसेच ६ लाख ७१ हजार ४६० लिटर इथेनॉल उत्पादन झाले. असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील , व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments