8 सप्टेंबर राष्ट्रीय बांबू दिनबांबू व बांबूशेती सर्वांसाठी वरदानच किंवा"हिरवे सोने"असलेला बांबूशेती व प्रकिया उद्योग फायदेशीर
धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत लागणार एक महत्वपूर्ण घटक आहे. बांबूला "हिरवे सोने "म्हणून ओळखले जाते.आज बदललेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती,बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू ,पदार्थ व रसायन समाजातील सर्व घटक व्यापार-व्यवसायासाठी फायदेशीर असून ते एक वरदानच म्हणावे लागेल.काळाची आवश्यकता ओळखून शासनाने पावले टाकण्यास टाकण्यास सुरुवात केली आहे, आताची वाटचाल चांगली व समाधानकारक आहे,बरेच शेतकरी पारंपारिक पिकांना थोडासा फाटा देणून बांबूशेतीकडे वळले-वळत आहेत,दुसरीकडे बांबूच्या वस्तू महागड्या असल्या तरी त्याकडे सध्या श्रीमंत लोकांचे आकर्षण वाढत आहे. एकमात्र खरे आहे की कमी खर्चाच्या ,कमी कष्ट व कमी डोकेदुखी च्या या बांबूशेती ,उत्पादन व वस्तू निर्मितीतून रोजगाराच्या चांगल्या संधी व पैसा मिळणार आहे व प्रदूषणात दिवसेंदिवस अमाप भर घालणाऱ्या प्लॅस्टिकचे वाढते आक्रमण थोपवण्यास मदत,गती मिळणार आहे.
बांबूचे अधिक महत्व ओळखुन तत्कालीन केंद्र सरकारने 2006-7या वर्षात बांबू मिशन सुरु केले,पण वन कायद्यामुळे अनेक अडचणी आल्या होत्या,त्यामुळे मिशन फार पुढे सरकू शकले नाही,आता मोदी सरकारने या मिशनकडे जास्त लक्ष दिले आहे,विशेष म्हणजे या सरकारने सन 2018-19च्या अंदाजपत्रकात1290 कोटींची दोन वर्षाकरिता भरीव तरतूद केली व एक लाख हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्याचा निर्धार केला.एवढेच नव्हे तर सरकारने 1972 च्या वन कायद्यातून अत्यन्त जाचक अटी व तरतुदी रद्द करून बांबूला जंगल(वन) मुक्त केले व बांबूला लाकडाऐवजी गवताचा दर्जा दिला त्यामुळे अनेक वर्षांचा अडथळा दूर होऊन विकासाचा मार्ग सुकर झाला,आता वनखात्याच्या जमिनीशिवाय देशात कुठेही व कोणालाही बांबूचे पीक घेण्याची मुभा मिळाली,आज त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.खत,फवारणी, पाणी,मजूर व मेहनत कमी लागत असल्यामुळे तसेच शासकीय अनुदानाची योजना असल्याने शेतकऱ्यांचा कल बांबूशेती व तदअनुसंगिक व्यवसायाकडे वाढत -वाढला आहे. या पिकाला किडीचा धोकाही फार कमी प्रमाणात आहे .सरकारने बांबूच्या जाती, माती परीक्षण,पीक,उत्पादन , खरेदी-विक्री,विपणन (मार्केटिंग)संदर्भात मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षणाची सोय केली आहे.जगाच्या एकूण बांबू लागवड क्षेत्रापैकी 19टक्के क्षेत्र भारतात आहे त्यापैकी फक्त 6 क्षेत्रावर बांबू उत्पादन घेतले जाते,त्यामुळे बांबूच्या काही वस्तू आयात कराव्या लागतात.
एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास भारताला दरवर्षी 2लाख30 मेट्रिक टन उदबत्ती लागते त्यापैकी 1लाख 70 मेट्रिक टन उदबत्ती चीनहून आयात करावी लागते म्हणजे तेवढा पैसा बाहेर जातो.जगात बांबूच्या पंधराशे जाती आहेत,त्यातील 100-150 जातीचे बांबू पीक घेण्याचा प्रयत्न भारतात केला जात आहे,त्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ कार्यरत आहे.महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी वन खात्यावर सोपविली आहे,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अधिक लक्ष घालून अनेक ठोस निर्णय घेतले आहेत,त्यातूनच चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आकाराला आले आहे व काही विद्यापीठात बांबू प्रशिक्षण सुरू आहे,त्याचा फायदा अनेक तरुणांना विशेषतः बांबूवर जीवन जगणाऱ्या बुरुड समाजास होत आहे.आज बेरोजगार तरुण, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बांबुशेती व बांबुउद्योग हा एक आशेचा किरण बनला आहे,हे मात्र खरे आहे.विशेष म्हणजे बांबू बहुगुणी असल्यामुळे फर्निचर,कापड इथेनॉल,औषध ,शोभेच्या व गृहसजवटीच्या वस्तू निर्मितीला खूप मोठा वाव आहे........
0 Comments