संभाजी भिडें विरोधात आरोपपत्र दाखल करा,
मे.हायकोर्टाचे पोलिसांना आदेश.....
मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दंगली प्रकरणी भिडे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या पोलिस अधिकार्यांना मे. कोर्टाने फटकारले आहे. यावेळी भिडे यांच्या विरोधात ११ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश यावेळी मे.हायकोर्टाने दिले आहेत.१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव संग्रामाला २०० वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यभरातून लाखो भीम अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमले होते. यावेळी दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. यावेळी पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करण्यात आली.दरम्यान, दंगल भडकावल्या प्रकरणी संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता संभाजी भिडे आणि इतर आरोपींच्या विरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण करुन, 11 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा,असा आदेश मे.मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
0 Comments