आ.भारत भालके कोणता झेंडा घेणार हाती ? निर्णय तरी केव्हा ...?आ.भारत भालके यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.तथापि भाजप की शिवसेना ? यापैकी नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करायचा या संदर्भात ठोस निर्णय मंगळवेढ्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केला नाही. 'मी तुमचा...तुम्ही माझे'...अशी भावनिक साद उपस्थितांना घातली. दरम्यान पक्षप्रवेशाचे भिजत घोंगडे कधी निघणार हा प्रश्न सध्यातरी कायमच राहिलाय.
0 Comments