Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवप्रेमींनो धोका अजून टळला नाही, रात्र वैऱ्याची आहे


शिवप्रेमींनो धोका अजून टळला नाही,रात्र वैऱ्याची आहे

_मुघल सरकार ,कामगिरी दमदार !_

मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतायेत ,पर्यटनमंत्री रावळ खोटं बोलतायत, पर्यटन सचिव खोटं बोलतायेत, राज्य पुरातत्व संचालक तेजस गर्गे सुद्धा खोटं बोलतायेत. सारवासारव चालू झाली आहे, पण आज जे वाचताय त्याच्यावर शिक्कामोर्तब २३ ऑगस्ट २०१६ लाच झालंय.

प्रश्न २५ किल्ल्यांचा नाहीये तर पर्यटन मंत्रालयाने महाराष्ट्रातल्या तब्बल २०० किल्ल्याचा 'असाच' विकास करण्याचा घाट घातलाय.

केंद्र पुरातत्व ने संरक्षित केलेल्या राज्यातील सगळ्या किल्ल्यांवर, अगदी किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा रिसॉर्ट उभारण्याचे , बांधकामे करण्याचे अधिकार केंद्र पुरात्तव खात्याने MoU (A memorandum of understanding सामंजस्य करार ) अंतर्गत २३ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाला दिलेले आहेत. त्यावेळेच्या या फोटोमध्ये जयकुमार रावळ, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा, पर्यटन सचिव वळसा नायर, केंद्र पुरातत्व चे अतिरिक्त संचालक शरद शर्मा दिसत आहेत.

जयकुमार रावळ यांनी हा करार झाल्यावर लगेचच Indian Heritage Hotels Association (IHHA) च्या वार्षिक सभेला ३ सप्टेंबर २०१६ ला उदयपूर येथे हजेरी लावून अनेक हॉटेलीयर्स शी बोलणी करून त्यांना महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलंय. *सुमारे २०० किल्ल्यांवर अशी हेरिटेज हॉटेल्स बांधण्याचा घाट आहे. लोकांच्या भावना चाचपण्यासाठी हि २५ किल्ल्यांची पहिली घोषणा केली गेली.

काय तर म्हणे हे किल्ले, गढ्या शिवरायांशी संबंधित नाहीत, अरे मूर्खांनो सगळे किल्ले मराठ्यांचेच होते, शिवरायांच्या नातवाच्या शाहूंच्या काळात मराठवाड्याचा काही भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र अधिपत्याखाली होता..

सगळ्यांवर लक्ष असुद्या , जे आज गप्प बसलेत ते सगळे यांच्यात सामील आहेत हे लक्षात ठेवा !

जय शिवराय !!!
Reactions

Post a Comment

0 Comments