शिवसेना इच्छुकांच्या उद्या मुंबईत होणार मुलाखतीसोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती उद्या मुंबई दादर येथील शिवसेना भवनात होत आहे आहेत. विश्वनाथ नेरुरकर विजय कदम डॉ श्रीकांत शिंदे अमोल कीर्तिकर ,प्रकाश पार्लेकर , डॉ मनीषा गावंडे, वरून सरदेसाई ,आदीजण शिवसेनेचे नेते या मुलाखती घेणार आहेत.दरम्यान सोलापूर शहर मध्य मतदार संघातून महेश कोठे , दिलीप माने तसेच लक्ष्मीकांत
ठोंगे-पाटील शहर दक्षिण मधून गणेश वानकर ,अमर पाटील मंगळवेढ्यातुन शैला गोडसे , मोहोळ मधून मनोज शेजवाल आणि नागनाथ क्षिरसागर बार्शीतून दिलीप सोपल , सांगोल्यातून शहाजीबापू पाटील तसेच दीपक साळुंखे.
करमाळ्यातून आमदार नारायण पाटील तसेच रश्मी बागल हे इच्छुक मुलाखती देतील असे अपेक्षित आहे.दरम्यान शहर उत्तर मतदार संघातून अद्याप इच्छुक म्हणून कोणाचेही नाव पुढं आलेले नाही त्यामुळे इथून कोण मुलाखत देणार हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
0 Comments