Hot Posts

6/recent/ticker-posts

धुळे केमिकल फॅक्टरीत स्फोट २० जणांचा मृत्यू

धुळे केमिकल  फॅक्टरीत स्फोट २० जणांचा मृत्यू 
धुळे येथील शिरपूर मधील वाघाडी येथे केमिकल फॅक्टरी मध्ये स्फोट झाला असून त्या घटनेत २० जणांचा मृत्यू झालेला आहे व २२  गंभीर जखमी झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ९;४५ च्या  सुमारास हा स्फोट झाल्याचे समजले आहे. दरम्यान घटनेच्या वेळेस फॅक्टरीमध्ये १०० कामगार उपस्थित होते. ७० जण आत अडकल्याची माहिती समोर येतीय. बचावकार्य सुरु आहे .स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे या आगीमुळे आजूबाजूच्या घरांची पडझड झाली आहे व आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत 
Reactions

Post a Comment

0 Comments