
मोहोळ (प्रतिनिधी)ः आजच्या परिस्थितीत लोक प्रपंच करण्यासाठी राजकारणात येतात. परंतु, समाजकारणातून सज्जन पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केली. कदाचित पैशाने सज्जनराव कमी असतील, परंतु मनाने खूप श्रीमंत आहेत. राजकारणात पाठीमागे जनताच असावी लागते. अनेक खाच-खळग्यांवर मात करीत अपयशाने खचून न जाता नव्या उभारीने काम करून लोकसंपर्क वाढवून काम करणार्यांना जनतेने निवडून दिले पाहिजे, असे सांगत जर कोणाला राजकारणात पैशाची मस्ती दाखवायची असेल तर अपघाताने निवडून आलेल्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, त्यांची अनामत रक्कम जप्त नाही केली तर राजकारण सोडेन, असे परखड प्रतिपादन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन राजन पाटील यांनी केले. .
सोमवार, दि. ९ रोजी दूध संघाचे माजी संचालक तथा बाजार समितीचे सदस्य सज्जनराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभप्रसंगी राजन पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती नागेश साठे, जि.प. सदस्य उमेश पाटील, भारत गायकवाड, रामचंद्र खांडेकर, धनाजी गावडे, कालिदास गावडे, समाधान गावडे, ब्रह्मदेव चव्हाण, अभिमान वाघमोडे, दत्तात्रय करे, हणमंत पोटरे, चंद्रहार चव्हाण, दीपक माळी, राहुल क्षीरसागर, भारत गुंड, महेश मसलकर, रामराजे कदम, कैलास माळगे, आप्पा सलगर, हरिभाऊ अवताडे, अशोक अवताडे, बाबा अवताडे, अनिल अवताडे, मुकुंद अवताडे, भागवत शिंदे, शहाजी पाटील आदी उपस्थित होते..
सत्काराला उत्तर देताना सज्जन पाटील म्हणाले की, अगदी लहान वयातच वडिलांचे कृपाछत्र हरविले. तरीही खचून न जाता संघर्ष करीत समाजकारणाची आवड असल्याने राजकारणात आलो.
शिवसेनेत काम करीत असताना ही बाब लक्षात आली की, मोहोळ तालुक्याच्या राजकारणात काम करायचे असेल तर केवळ राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम केल्यास भागाचा व गावचा विकास होणार आहे व धनगर समाजाला राजकीय मुख्य प्रवाहात आणणारे केवळ राजन पाटीलच आहेत. म्हणून २ फेब्रुवारी २००० रोजी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पुढील काळात शेवटच्या श्वासापर्यंत राजन पाटील यांच्याच सोबत राहणार असल्याचे सांगितले..
0 Comments