माढा (प्रतिनिधी)ः माढा तालुक्यातील रोपळे (खुर्द) येथील डिपी दुरुस्ती संदर्भात व बुद्रुकवाडी येथील डिपीवरील लोड कमी करण्यासंदर्भात निवेदन देऊनही महावितरणच्या कार्यालयाने कसलीही दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (भैय्या) देशमुख यांनी शेतक-यांसमवेत माढा महावितरणच्या कार्यालयाला १६ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी टाळे ठोकले.
आत कार्यालयामध्ये अडकलेल्या पाच वीज वितरणचे कर्मचारी व तीन ग्राहक यांची सुमारे दोन तासानंतर लेखी आश्वासन दिल्यानंतर सुटका करण्यात आली.हे आंदोलन सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले. जनहित शेतकरी संघटने मार्फत ३ मार्च रोजी बुद्रुकवाडी येथील केसरी डिपीवरील वीजेचा भार कमी करून दळवी डिपीवरती वर्ग करावा व रोपळे खुर्द येथील दोन महिन्यापूर्वी जळालेला शिंदे वस्तीचा डिपी दुरूस्त करण्यासंदर्भात श्री पडवळकर साहेब यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत महावितरणने कसलीही दखल न घेतल्यामुळे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन तास शेतकर्यांनी महावितरणला टाळे ठोकले. त्यामुळे महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांच्यासह समाधान फरतडे, प्रदिप कदम, रमेश चव्हाण, सुरेश फरतडे या कर्मचा-यासह तीन ग्राहकांना दोन तास कार्यालयामध्ये बसावे लागले. शेतक-यांकडून बेजबाबदार महावितरणच्या अधिका-यांचा व राज्याचे उर्जामंत्री यांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. ५ दिवसात डिपी दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
त्याप्रसंगी प्रभाकर (भैय्या) देशमुख , गणेश शिंदे,जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वरूण पाटिल, सुशील पाटील, दिपक भोसकर ,जनहित शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विजय मोरे, तालुका अध्यक्ष सतिश पवार, समाधान थोरात, योगेश शिंदे, शंकर सावंत, भूमाता शेतकरी संघटनेचे मारूतीराव जगदाळे, अजित चव्हाण, हणमंत लोंढे, योगेश घोरपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

0 Comments