Hot Posts

6/recent/ticker-posts

फुले दाम्पत्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी

माढा (प्रतिनिधी)ः महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी त्यांनी खूपच कष्ट घेतले म्हणूनच आज आपण सर्वजण त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करीत असल्याचे प्रतिपादन माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांनी केले आहे. ते माढा येथे महात्मा फुले प्रतिष्ठानने आयोजित महात्मा फुले गौरव पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी  बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त ञिंबक ढेंगळे-पाटील हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण राऊत यांनी केले.
पुढे बोलताना माजी आमदार धनाजीराव साठे म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे देशातील महिला विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवीत आहेत.फुल्यांच्या  कार्याचा आदर्श घेत महात्मा फुले प्रतिष्ठान कार्य करीत असून प्रतिष्ठान सामाजिक विकासाभिमुख कार्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एकत्रितरित्या करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी महात्मा फुले प्रतिष्ठान राट्रपिता महात्मा जोतीराव फुलें यांच्या विचाराचा वारसा चालवीत असून शाहू फुले आंबेडकराचे विचार जपण्याचे कार्य करीत आहे.तत्कालीन काळात महात्मा फुले यांनी जलसंधारण शेती शिक्षण अशा अनेक क्षेत्रात काम केले.यामुळे आज त्यांच्या विचारानुसार जगाला वाचवण्यासाठी प्रथम पाणी वाचविले पाहिजे ही गरज व्यक्त केली. महात्मा फुले प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपायुक्त ञिंबक ढेंगळेपाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्राची पहिली बालयोगिनी कु श्रुती शिंदे हिचा दीपयोगा हा डोळे दिपवून टाकणारा कार्यक्रम पार पडला.आजपर्यंत अनेक योगासने पाहिली मात्र अशा दीपयोगाचे प्रात्यक्षिक पहिल्यादाच पाहायला मिळाल्याने श्रुतीचे भरभरून कौतुक यावेळी नागरिकांनी केले. प्रतिष्ठानच्या वतीने श्रुती शिंदे आणि आर्टिस्ट उदय मोहिते यांना महात्मा फुले विशेष गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.माढा आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदर्श व्यक्तींना उपायुक्त त्रिंबक ढेंगळेपाटील यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार सदाशिव पडदुणे, नगराध्यक्ष गंगाराम पवार, उपनगराध्यक्षा ऍड. मिनलताई साठे, माजी जि. प.सदस्य झुंजारनाना भांगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, सपोनि अतुल भोस,माजी नगराध्यक्षा अनिता सातपुते, महिला व सभापती कल्पना जगदाळे, आरोग्य सभापती प्रभाकर जाधव, नगरसेवक ऍड. नागनाथ शिवपुजे, माजी नगराध्यक्ष  राहुल लंकेश्वर, नगरसेविका सुप्रिया बंडगर ,महाराष्ट्राची पहिली बालयोगिनी कु श्रुती शिंदे , योगगुरू प्रवीण बांदेकर, मुंबईचे आर्टिस्ट उदय मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ माळी, तानाजी माळी, समाधान राऊत, शेखर म्हेञे, किरण शेलार, चंद्रकांत कांबळे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन भिष्माचार्य ढवण यांनी तर आभार डॉ.हनुमंत क्षिरसागर यांनी मानले.   
Reactions

Post a Comment

0 Comments