Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्षवेधी मिरवणुकीने श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्वाला प्रारंभ

सोलापूर (प्रतिनिधी)ः ’श्री योगिराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय’ च्या जयघोषात... मिरवणुकीत अश्वारुढ झालेले डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य... रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या बग्गीत बसलेले शिवाचार्य गण.. डोक्यावर जलकुंभ घेतलेले सुहासिनी... मिरवणुक मार्गावरील रांगोळ्याच्या पायघड्या व पुष्पवृटी... पंचरंगी झेंडा आणि भगवे झेंडे... स्वागतासाठी रस्त्याच्या दुर्तफा झालेली भाविकांची गर्दी... जीपवर ठेवलेली योगिराजेंद्र शिवाचार्य यांची आकर्षक मुर्ती... ही बोलकी क्षणचित्रे आहेत श्री बृहन्मठ होटगी मठाचे लिं. ष. ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमहोत्सवाच्या मिरवणुकीतील!.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथून होटगी मठाचे मठाध्यक्ष धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणूकीचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते श्रीशैल पीठाचे आद्य जगदगुरू पंडिताराध्य शिवाचार्य यांच्या मूर्तीचे व शिवलिंग आणि गोमातांचे पूजन करून करण्यात आले. हा सोहळा गौडगावचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, चिटगुपाचे गुरूलिंग शिवाचार्य, मागणगेरीचे डॉ. विश्वाराध्यक्ष शिवाचार्य, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य, पानमंगरूळचे शिवयोगी शिवाचार्य आदींच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. या मिरवणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, माजी आमदार शिवशरण पाटील, स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, नगरसेवक शिवानंद पाटील, चेतन नरोटे, डॉ. किरण देशमुख, नागेश भोगडे, अमर पुदाले, नगरसेविका अंबिका पाटील, नरेंद्र गंभीरे, केदार उंबरजे, सोलापूर लोकसभा कॉग्रेस युवक अध्यक्ष सुदीप चाकोते, तम्मा मसरे, राजशेखर हिरेहब्बू, विराज पाटील आदींनी सहभाग नोंदविला..
ही मिरवणूक सिध्देश्वर मंदिरापासून पुढे सिध्देश्वर प्रशालेमार्गे पंचकट्टा-विजापूर वेस-आजोबा गणपती-मधला मारूती येथे आली. या ठिकाणी बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिर येथून पूजा करून आलेल्या ३ हजार जलकुंभधारी सुवासिनी मिरवणूकीत सहभागी झाल्या. याबरोबरच डोक्यावर श्री सिध्दान्त शिखामणी पारायण ग्रंथ घेतलेल्या महिला व युवतींचाही यामध्ये समावेश होता. ही मिरवणूक पुढे कोंतम चौक-कन्ना चौक-उद्योग बँक-जोडबवण्णा चौक-अक्कलकोट रोड पाण्याची टाकी मार्गे श्री वीरतपस्वी मंदिरात पोहोचली. त्यानंतर सुवासिनींच्या ओटीभरणाचा कार्यक्रम धार्मिक विधीपूर्वक शिवाचार्यांच्या हस्ते पार पडला. ओटीभरणाचा पहिला मान महापौर शोभा बनशेट्टी यांना देण्यात आला. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी बृहन्मठ होटगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार, सहसचिव शांतय्या स्वामी, संचालक राजशेखर फताटे, सिध्देश्वर नरोळे, भाऊ लिंग दिंडूरे, आप्पासाहेब पाटील, विजयकुमार शाबासे, चिदानंद वनारोटे, सिध्देश्वर बमणी, सकलेश विभूते, नंदकुमार मुस्तारे, आनंद स्वामी, शिवानंद मुनाळे स्वामी, श्रीशैल हत्तुरे, सिध्देश्वर बमणी, हरिष पाटील, राजकुमार पाटील, सिध्दय्या स्वामी, प्रशांत हब्बु, प्रभुराज विभूते, मल्लिनाथ खुणे, सिध्दारूढ निंबाळे, बाळासाहेब मुस्तारे आदीनी परिश्रम घेतले..
Reactions

Post a Comment

0 Comments