Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढ्यात वाहतूक पोलीसाकडून डमी पावत्याद्वारे वाहनचालकांची लुट सुरू

मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मंगळवेढा येथे नेमणूकीस असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसाने साध्या कागदावरील स्वलिखीत पावत्या बनवून वाहनचालकांची अक्षरशः  लुट करून शासनाची फसवणूक केल्याने संबंधितावर वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मंगळवेढ्यात वाहतूक विभागाकडे असलेला हा म्होरक्या मनमानी कारभार करून वाहन चालकाशी हुज्जत घालत असून त्याला विचारणा करणार्यासही तो उलटसुलट बोलत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वी कांही दिवसापूर्वी त्याने सांगोला रोडवर एका पशुपालकाला अडवून त्याचेकडून रक्कम उकळल्याचा प्रकार घडला असून याबाबत वृत्तपत्रात वृत्तही प्रसिध्द झाले होते. तरीदेखील त्याचेवर स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करत  त्याला पाठबळ दिल्याची चर्चा होत आहे. सोमवारी ग्र्रामीण भागातील एका दुचाकीस्वाराला त्याने अडविले व तुझ्या वाहनावर फॅन्सी  नंबरप्लेट असून तू मोटार वाहन अधिनियम कायदा कलम ५१/१७७ ला पात्र असून तुला हजार रूपये दंड करण्यात येणार आहे असे एका साध्या कागदावर लिहून त्या पाठीमागे स्वतःचे नावही लिहिले व तो कागद त्याने त्या तरूणाकडे सुपूर्द केला. पोलीसाच्या या कृत्यामुळे भयभीत झालेल्या त्या दुचाकीराने निमुटपणे हजार रूपये काढून दिले मात्र त्याला शासनाची अधिकृत दंड भरल्याची पावती देण्याऐवजी  त्याने साध्या कागदावर मजकुर लिहून त्याचे नाव टाकून त्याला दिला मात्र आपण  फसलो गेल्याचे त्या वाहनचालकाच्या निदर्शनास आल्याने तो आता या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे दाद मागणार आहे.
सदरचा वाहतूक पोलीस त्याच्या विविध कारनाम्यामुळे सतत वादग्रस्त राहिलेला असून त्याला जिथे ड्युटी देण्यात येते त्या विभागात तो आजपर्यंत वादग्रस्त ठरल्या
Reactions

Post a Comment

0 Comments